शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीच्या निलेशची ५ वर्षांत तीन शासकीय पदावर नियुक्ती; गावकऱ्यांचा फटाके फोडून आनंदोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 14:32 IST

शिक्षणाधिकारी पदाचा निकाल येताच गावकऱ्यांनी फटाके फोडून केला आनंदोत्सव

- नितीन कांबळेकडा- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरीचे रहिवासी निलेश अर्जून गुंड यांची शिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. पाच वर्षांत एसटीआय, सहाय्यक प्रकल्प अधिकारी ते शिक्षणाधिकारी असा प्रेरणादायी प्रवास निलेश यांनी केला आहे. अधिकारी पदाची हॅट्रिक साध्य केल्याने गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. 

बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गुंड यांचे निलेश चिरंजीव आहेत. निलेश यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय गढी येथे झाले. पुढे त्यांनी पुणे येथून अभियंत्याची पदवी घेतली. याच काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करत २०१७ साली त्यांची एसटीआय पदावर निवड झाली. तर २०२० च्या राज्य सेवेतून त्यांची सहायक प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास विभाग) पदी निवड झाली. सध्या सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे ते कार्यरत आहेत. 

दरम्यान, २०२२ सालच्या राज्य सेवेतून त्यांची शिक्षणाधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांच्या यशाची वार्ता समजताच ग्रामस्थांनी गावात फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी मोहन जगताप, भागचंद झांजे, जयश्री जगताप, डॉ मेघा जगताप, डॉ. सुखदा जगताप,डॉ. संपदा जगताप, उद्योजक नागेश मुळीक, गोवर्धन तळेकर, मच्छिंद्र मुळीक, प्रकाश गुंड आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :BeedबीडMPSC examएमपीएससी परीक्षा