शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परळीत नवे उर्जापर्व! जुन्या औष्णिक केंद्राच्या जागेत ५० मेगावॅट सौर प्रकल्पाला मंजुरी, निविदा प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:02 IST

परळी केंद्रातील ३० मेगावॅटचे दोन आणि २१० मेगावॅटचे तीन संच आयुर्मान संपल्यामुळे बंद करण्यात आले होते.

परळी (प्रतिनिधी): परळीच्या वैभवात भर घालणाऱ्या जुन्या औष्णिक विद्युत केंद्राच्या जागेत आता सौर उर्जेचा भव्य प्रकल्प साकारणार आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या आणि निष्कासित करण्यात आलेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत ५० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. महानिर्मिती (महाजनको) कंपनीने शनिवारी, २४ जानेवारी रोजी या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध केल्याने कामाला मोठी गती मिळाली आहे.

परळी केंद्रातील ३० मेगावॅटचे दोन आणि २१० मेगावॅटचे तीन संच आयुर्मान संपल्यामुळे बंद करण्यात आले होते. या संचांच्या साहित्याची भंगारात विल्हेवाट लावल्यानंतर ही मोकळी जागा वापराविना पडून होती. येथे ३५० मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारावा, अशी आग्रही मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रकल्प मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे.

रोजगाराची मोठी संधीपहिल्या टप्प्यात ५० मेगावॅट निर्मितीचे नियोजन असून, यामुळे परळी आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. कोळशावर आधारित केंद्राने परळीला ओळख दिली, आता तोच वारसा सौर उर्जेच्या माध्यमातून पुढे सुरू राहणार आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याबद्दल त्यांचे आभार मानले असून, हा प्रकल्प परळीच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

तिन्ही संच पूर्ण क्षमतेने कार्यान्वितनवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रत्येकी २५० मेगावॅट क्षमतेचे तिन्ही संच सध्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असून, एकूण ७५० मेगावॅट इतकी वीज निर्मिती सुरू आहे. शनिवारी दुपारी तिन्ही संच चालू होते. परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने तिन्ही संच पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parli to Get 50 MW Solar Project on Old Plant Site

Web Summary : Parli's old thermal plant site to house a 50 MW solar project. Government approved; tenders issued by Mahajanako. This initiative promises employment and continues Parli's energy legacy via renewable resources, fulfilling a key legislative promise.
टॅग्स :Beedबीडelectricityवीज