नवीन शैक्षणिक धोरणामुळे संस्कृत पुनश्च जनभाषा होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:36 IST2021-08-28T04:36:50+5:302021-08-28T04:36:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेचा आजचा प्रसार आणि प्रचार हा योग्य पद्धतीने होत ...

नवीन शैक्षणिक धोरणामुळे संस्कृत पुनश्च जनभाषा होईल
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेचा आजचा प्रसार आणि प्रचार हा योग्य पद्धतीने होत असून शासनस्तरावर देखील याबाबत प्रयत्न चालू आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात संस्कृत भाषेला अनन्यसाधारण महत्त्व दिल्यामुळे येत्या काळात संस्कृत भाषा ही पुन्हा एकदा जनभाषा होईल, असे प्रतिपादन शालेय समिती अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी केले.
स्वा. सावरकर माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन संस्कृत दिन साजरा करण्यात आला, याप्रसंगी अध्यक्षीय समारोपात कुलकर्णी बोलत होते.
प्रास्ताविक करताना संस्कृत विभाग प्रमुख रमण कुलकर्णी यांनी संस्कृत दिनाचे महत्त्व सांगत कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. कार्यक्रमास आर्या देशमुख, प्रणव पत्की, मल्हार पत्की, ईश्वरी पाटसकर, सुरभी निराळे, प्रणव केटे, यशोधन देशमुख, कैवल्य डोळे, भार्गवी जगताप, वैष्णवी शेटे, वरद कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेतच सादरीकरण केले.
संस्था सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे, स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष गजाननराव जगताप, कार्यवाह डॉ. विवेक पालवणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक संजय विभुते, विठ्ठल काळे यांच्यासह सर्व विद्यार्थी व शिक्षकही ऑनलाईन उपस्थित होते.
270821\27_2_bed_1_27082021_14.jpg
संस्कृत