इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:16+5:302021-07-08T04:23:16+5:30
बीड : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे प्रचंड प्रमाणात दर वाढवले. या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. ...

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची निदर्शने
बीड : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे प्रचंड प्रमाणात दर वाढवले. या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात निदर्शने करण्यात येत आहे. बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. महिलांनी केंद्राचा निषेध करीत कार्यालयासमोर चुली पेटवून स्वयंपाक केला. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे चार दिवसाला भाव वाढत आहेत. या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला. भाववाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात निदर्शने करण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यातही अनेक तालुक्यात राष्ट्रवादीने आंदोलन केले. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र निदर्शने करीत केेंद्र सरकारचा निषेध केला.
यावेळी महिलांनी कार्यालयासमोर चुली पेटवून स्वयंपाक केला. आंदोलनात माजी आमदार सुनील धांडे, डी.बी.बागल, उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, बळीराम गवते, तालुकाध्यक्ष विनीश उबाळे, भाऊसाहेब डावकर, दीपक कुलकर्णी, के.के.वडमारे, कल्याण आखाडे, रमेश चव्हाण, खुर्शीद आलम, बरकत पठाण, संगीता तुपसागर, सुनील पाटील, ॲड. हेमा पिंपळे, प्रज्ञा खोसरे, कमल निंबाळकर, विद्या जाधव, पंकज बाहेगव्हाणकर, सचिन शेळके, जयमल्हार बागल, कुंदन काळे, नंदकुमार कुटे, माउली सानप, शेख मेहेराज यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
070721\07_2_bed_13_07072021_14.jpg
जिल्हाधिकारी कार्यालयापुढील आंदोलन