शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून...; खातेवाटप होताच मंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 20:31 IST

मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

NCP Dhananjay Munde ( Marathi News ) : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर आठवड्याभराने काल शनिवारी खातेवाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर वादात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. या जबाबदारीची घोषणा झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि राज्यातील जनतेला आपण दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडू, अशा शब्दांत आश्वस्त केलं आहे.

धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यंत्री तथा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा. सुनीलजी तटकरे साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय प्रफुल्ल भाई पटेल यांसह सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो. राज्यातील जनतेशी थेट निगडित हे खाते असल्याने मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन," असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

मंत्रिमंडळातून हकालपट्टीची होत होती मागणी

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण राज्यभर गाजले. यासह आठवडाभरात परळीतील उद्योजक अपहरण, बीडमधील गोळीबार, मस्साजोगमधीलच खंडणी प्रकरण आदी घटनांमुळे बीड आहे की बिहार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. बीडमधील सरपंच हत्यासह इतर मुद्दे जिल्ह्यातील सत्ताधारी, विरोधी आमदारांनी अधिवेशनात उपस्थित केले. या सर्वांच्या बोलण्यातून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे दिसले. त्यामुळे सरपंच हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करावं, अशी मागणीही विरोधी पक्षातील आमदारांसकडून करण्यात येत होती.

'या' आमदारांनी अधिवेशनात उठवला आवाज

बीडमधील वेगवेगळ्या प्रकरणांवर हिवाळी अधिवेशनात आमदारांनी आवाज उठवला. यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आदी लोकप्रतिनिधींचा समावेश होता. याचीच दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारांविरोधात मकोका कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याचं सांगितलं.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेस