एनसीसीच्या कॅडेट्सनी ऑफिसर व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST2021-03-05T04:33:12+5:302021-03-05T04:33:12+5:30

वार्षिक शिबिर : सुभेदार मेजर उपेंद्रकुमार सिंह यांचे आवाहन धारूर : राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटसने भविष्यात लष्करात अधिकारी होण्यासाठी ...

NCC cadets should become officers | एनसीसीच्या कॅडेट्सनी ऑफिसर व्हावे

एनसीसीच्या कॅडेट्सनी ऑफिसर व्हावे

वार्षिक शिबिर : सुभेदार मेजर उपेंद्रकुमार सिंह यांचे आवाहन

धारूर

: राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटसने भविष्यात लष्करात अधिकारी होण्यासाठी करिअर करण्याचे आवाहन सुभेदार मेजर उपेंद्रकुमार सिंह यांनी केले.

महाराष्ट्र बटालियन ५१ औरंगाबादच्या वतीने येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात चालू असलेल्या वार्षिक शिबिरामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, एनसीसीच्या कॅडेट्सनी कठोर मेहनत घेऊन यश संपादन करावे. मेजर एस. पी. कुलकर्णी यांनी कॅडेट्सना आपले नाव कमविण्यासाठी एनसीसी हे एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध असल्याचे सांगितले. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले जीवन यशदायी बनविण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ एनसीसी मधून आपले जीवन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा. अभ्यास करून उच्च शिखर गाठावे, असे आवाहन त्यांनी केले. एनसीसी आपणास शिस्त आणि चिकाटी या दोन्हींच्या या माध्यमातून चांगल्या मार्गाची निवड करण्यास शिकवते, असे सांगितले.

यावेळी सुभेदार भोला जोशी, हवालदार पी. एम. दराडे, उपप्राचार्य महादेव जोगडे व कॅडेट्स उपस्थित होते. मेजर डॉ. मिलिंद गायकवाड यांनी सूत्रसंचालन व आभार केले.

===Photopath===

030321\4536img-20210303-wa0163_14.jpg

Web Title: NCC cadets should become officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.