नवनाथ औंधकर यांचा बदलीनिमित्त सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:57+5:302021-07-09T04:21:57+5:30
अंभोरा : आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील तलाठी नवनाथ औंधकर यांची बदली झाल्याने त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार त्यांना निरोप देण्यात ...

नवनाथ औंधकर यांचा बदलीनिमित्त सत्कार
अंभोरा : आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील तलाठी नवनाथ औंधकर यांची बदली झाल्याने त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार त्यांना निरोप देण्यात आला. तर त्यांच्या जागी आलेले बबनराव सावंत फुले यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी औंधकर यांनी ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून अनेक आठवणींना उजाळा दिला तर मलाही आपण सांभाळून घ्यावे, अशी विनंती सावंत फुले यांनी ग्रामस्थांना केली. सूत्रसंचालन दिनेश शहाणे यांनी केले. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके यांनी केले. संदीप सुंबे, दीपक डहाळे, छगनराव घोडके, फिरोज सय्यद, अशोक गर्जे, अर्जुन घोडके, ईश्वर ओव्हाळ, राहुल भादवे, मेहबूब पठाण, ताजुदीन पठाण, बाबा खटके, अक्षय घोडके, संदीप ओव्हळ, पोपट तोडमल, मारुती घोडके, शरद घोडके व ग्रामस्थ उपस्थित होते. शहानवाज पठाण यांनी आभार मानले.
070721\1656balasaheb raktate_img-20210706-wa0060_14.jpg