धारूरच्या मुख्य चौकाला तळ्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST2021-09-27T04:37:04+5:302021-09-27T04:37:04+5:30

-------------------------------------- मुख्य रस्ता रहदारीला मोकळा करा धारूर : शहरात बस स्थानक ते काशीनाथ चौक या दरम्यान रस्ता अरुंद ...

The nature of the lake at the main square of Dharur | धारूरच्या मुख्य चौकाला तळ्याचे स्वरूप

धारूरच्या मुख्य चौकाला तळ्याचे स्वरूप

--------------------------------------

मुख्य रस्ता रहदारीला मोकळा करा

धारूर : शहरात बस स्थानक ते काशीनाथ चौक या दरम्यान रस्ता अरुंद असून, रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांसह वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, वाहतूककोंडी हाते. रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी तत्काळ थांबवावी. नगरपरिषद व पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

------------------------------------------

अरणवाडी साठवण तलाव होतोय सेल्फी पॉइंट

धारूर : धारूर तेलगाव रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला निर्माण केलेला आरणवाडी साठवण तलावा हा यंदाच्या दमदार पावसामुळे पहिल्याच वर्षी भरल्याने मुबलक प्रमाणात पाणी झाले आहे. त्यामुळे परिसराचे नैसर्गिक सौंदर्य वाढले आहे. निसर्गरम्य परिसर अनेक जण मोबाइलमध्ये कैद करीत आहेत. अरणवाडी तलाव परिसर सेल्फी पाइंट होत आहे.

Web Title: The nature of the lake at the main square of Dharur