राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:33 IST2021-03-17T04:33:44+5:302021-03-17T04:33:44+5:30

गेवराई : तालुका विधिसेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने, १० एप्रिल रोजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय, क.स्तर ...

The National Lok Adalat should be successful | राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करावी

राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करावी

गेवराई : तालुका विधिसेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने, १० एप्रिल रोजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय, क.स्तर येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे.

या लोकअदालतीमध्ये गेवराई न्यायालयात दाखल असलेली व प्रलंबित असलेली कौटुंबिक प्रकरणे, दिवाणी दावे, फौजदारी खटले, बँकांची कर्ज प्रकरणे, नगरपरिषद वसुली, दूरध्वनी देयके, लाइट बिल इत्यादी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

आपापली प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवून, या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. मानसिक ताण, पैसा व वेळ वाचवून आपसातील मतभेद दूर होण्यास मदत होईल. या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये सकारात्मक सहभाग नोंदवून जास्तीतजास्त प्रकरणे मिटवून राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्याचे आवाहन तालुका विधिसेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्या.क.स्तर न्या.एम.पी. एखे यांनी केले आहे. राष्ट्रीय विधि प्राधिकरणाच्या वतीने १० एप्रिल रोजी आयोजित केलेली ही लोक अदालत उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून आयोजित करण्यात येणार आहे.

Web Title: The National Lok Adalat should be successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.