शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तरुणीचा पोलिस भरतीच्या लेखी परिक्षेपूर्वी अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 17:49 IST

पोलिस भरतीच्या लेखी परिक्षेच्या हॉल तिकीटची झेरॉक्स काढण्यासाठी जाताना तरुणीचा अपघाती मृत्यू!

- नितीन कांबळेकडा: पोलीस भरतीची लेखी परीक्षा असल्याने दोन दिवस अगोदरच वाघोली येथे भावाकडे गेलेल्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तरूणीचा मंगळवारी दुपारी हाॅल तिकीटचे झेरॉक्स काढण्यासाठी दुचाकीवर जात असताना भरधाव टिप्परच्या धडकेत मृत्यू झाला. आरती पांडुरंग नागरे ( १९, रा.रूटी इमनगांव ता.आष्टी )  असे मृत तरूणीचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील रूटी इमनगांव येथील आरती पांडुरंग नागरे ही राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू आहे. तिची पोलीस भरतीची लेखी परिक्षा ४ सप्टेंबर रोजी पुणे येथे होती. यामुळे आरती दोन दिवस अगोदरच वाघोली येथील भावाकडे गेली होती. मंगळवारी दुपारी हाॅल तिकीटची झेरॉक्स काढण्यासाठी आरती दुचाकीवरून जात होती. यावेळी वाघोलीवरून पुण्याच्या दिशेने खडी घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परवरील चालकाचे नियंत्रण सुटून आरतीच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात आरतीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात टिप्पर चालक शिवाजी तानाजी मुरकुटे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघाताची वार्ता समजताच गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

चार वेळी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभाग आरती ही कबड्डी खेळाडू होती. तिने चार वेळा राष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली होती. तसेच तिने दोन वेळा महाराष्ट्राच्या कुमार संघाचे नेतृत्व देखील केले होते. तर खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. खेळातील याच योगदानाच्या आधारे आरती आता पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होती. मात्र, अपघाती मृत्यूने पोलीस होण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू