नाल्यातील पाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST2021-06-25T04:24:10+5:302021-06-25T04:24:10+5:30

घाणीचे साम्राज्य केज : शहरात नगर पंचायतीच्या वतीने सफाई कामगार शहरातील घनकचरा उचलत नाहीत. यामुळे मंगळवार पेठ, मेन रोड, ...

Nala water on the road | नाल्यातील पाणी रस्त्यावर

नाल्यातील पाणी रस्त्यावर

घाणीचे साम्राज्य

केज : शहरात नगर पंचायतीच्या वतीने सफाई कामगार शहरातील घनकचरा उचलत नाहीत. यामुळे मंगळवार पेठ, मेन रोड, नाईकवाडे गल्ली, शनिमंदिर रस्ता, कानडी रोड, वकील वाडी भागात घाणीचे साम्राज्य आहे. घनकचरा उचलण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

रोहित्र धोकादायक

वडवणी : शहरातील तसेच ग्रामीण भागातील गावांना वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्या व रोहित्र उघडे असल्याने धोकादायक बनले आहेत. रोहित्राचे दरवाजे नसल्याने केबल जमिनीवर पसरले आहे. पावसाळ्यापूर्वी महावितरणने विद्युत कामे करणे आवश्यक बनले आहे.

जनावरांचा ठिय्या

माजलगाव : शहरातील रस्त्यावर, अनेक मार्गावर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेक वेळा अपघाताची उदाहरणे आहेत. जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.

रिंग रोड रस्त्याची दुर्दशा

अंबाजोगाई : शहरातील रिंग रोड परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम रखडल्याने हा पूर्ण रस्ता नादुरुस्त आहे. पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालविताना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Nala water on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.