मोठेवाडीत माझा गाव सुंदर गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST2021-02-08T04:29:11+5:302021-02-08T04:29:11+5:30
ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्यमान उंचवावे आणि गाव स्वच्छ व सुंदर व्हावेत, या हेतूने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर ...

मोठेवाडीत माझा गाव सुंदर गाव
ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्यमान उंचवावे आणि गाव स्वच्छ व सुंदर व्हावेत, या हेतूने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून २२ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये माझा गाव सुंदर गाव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे.
गाव स्वच्छता, उकिरडे गावाबाहेर काढणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या ठेवणे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे, प्लास्टिक बंदी, वृक्ष लागवड असे विविध उपक्रम या माध्यमातून गावात राबविले जाणार आहेत. ग्रामस्थांनी लोकसहभागातून आपला गाव समृद्ध करावा, असे आवाहन महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मुंडे यांनी केले.
यावेळी ग्रामसेवक आनंद सिरसाट, प्रभारी बाल विकास अधिकारी आर. एस. बुडूक, प्रवेक्षिका व्ही. जी. रत्नपारखी, सरपंच अविनाश गोंडे, उपसरपंच विद्यासागर करपे, प्रा. राम साळवे, मुख्याध्यापक तुकाराम शिंदे, शिक्षक संतोष जगताप, सुधाकर जाधव, सदस्य सर्जेराव जाधव, राम यादव, सुभाष सर्जे, गणेश सर्जे, अंगणवाडी कर्मचारी शकुंतला गिराम, पंचफुला पास्टे, शिवकन्या खेत्री, शारदा खेत्री, आशाताई चव्हाण, मुक्ता पास्टे, अनुसया पवार, संगीता आलाट, आशा वर्कर उर्मिला मनसुके, सीता बोरकर ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश शेळके, तुकाराम रासवे आदींची उपस्थिती होती.