१०३१ गावात राबविणार माझा गाव सुंदर गाव अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:29 IST2021-02-05T08:29:05+5:302021-02-05T08:29:05+5:30

अभिलेख्यांचे अद्यावतीकरण, अभिलेखे वर्गीकरण,नावीन्यपूर्ण उपक्रम, वन्य जीवांसाठी पाणवठा, ओपन जिम, गाव स्तरावरील सर्व शासकीय कार्यालयांची रंगरंगोटी करून भिंती बोलक्या ...

My Village Beautiful Village Campaign to be implemented in 1031 villages | १०३१ गावात राबविणार माझा गाव सुंदर गाव अभियान

१०३१ गावात राबविणार माझा गाव सुंदर गाव अभियान

अभिलेख्यांचे अद्यावतीकरण, अभिलेखे वर्गीकरण,नावीन्यपूर्ण उपक्रम, वन्य जीवांसाठी पाणवठा, ओपन जिम, गाव स्तरावरील सर्व शासकीय कार्यालयांची रंगरंगोटी करून भिंती बोलक्या करण्यात येणार आहे. सार्वजनिक वाचनालय कक्ष निर्मिती घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गाव स्वच्छता अभियान, करवसुली, नळजोडणी, घनवृक्ष लागवड, योजनांचे फलक लावणे आदी कामे ग्रामपंचायत पातळीवर केली जाणार आहेत. तर शाळांमध्ये अभिलेखे अद्यवतीकरण, वर्गीकरण, इ- लर्निंग सुविधा, शाळा तेथे प्रयोगशाळा, वाचनालय, ॲस्ट्रॉनॉमी क्लब, घनवृक्ष लागवड, क्रीडा साहित्य, वर्गखोल्यांची व भिंतींची रंगरंगोटीची कामे करून शाळांचे रूपडे पालटले जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातही रंगरंगोटी, येजनांचे माहिती फलक, अद्यावत वैद्यकीय उपकरणे, पॅथॉलाॅजिकल लॅब, परिसर स्वच्छता, शवविच्छेदन कक्ष, प्रतीक्षा कक्ष, बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन, वॉटर फिल्टर, तसेच लाईफ सेव्हिंग ड्रग्जची उपलब्धता करण्याचा प्रयत्न राहणार आहे. अंगणवाडीतील भिंती बाेलक्या होणार असून मुलांसाठी खुर्च्या व खेलणी ई- लर्निंग, परसबाग इतर नावीन्यपूर्णउपक्रम राबविले जाणार आहेत. पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात नाडेप व कंपोस्ट खत प्रकल्पाची कामे होणार आहेत.

----

४ फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ३- ३ गावात माझा गाव सुंदर गाव अभियानाला प्रारंभ हाणार असून चांगले काम करणाऱ्या गावांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी ११ तालुका सम्वयक व गावनिहाय एक समन्वयक नेमले असून जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, सर्व विभागांचे अधिकारी या अभियानात सहभागी होत अभियान यशस्वी करणार आहेत.

--------

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग घेऊन माझा गाव सुंदर गाव अभियानात उत्कृष्ट काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिवकन्या सिरसाट, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, इतर पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व सर्व अधिकाऱ्यांनी केले आहे.

-----

Web Title: My Village Beautiful Village Campaign to be implemented in 1031 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.