शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

माझ्या लेकीसह दोघी गेल्या, दुसऱ्यांच्या तरी वाचवा हो ! बीडच्या लाडक्या बहिणीला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:54 IST

उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणाऱ्या बीडच्या लाडक्या बहिणीला अश्रू अनावर

बीड : शिक्षणात हुशार, पण टवाळखोरांनी जाळे टाकून तिला प्रेमाचे आमिष दाखवून छळ केला. नंतर फोटो व्हायरलची धमकी देत ब्लॅकमेल केले. याच त्रासाला कंटाळून माझ्या लेकीने गळफास घेतला. तिच्या दोन मैत्रिणींनीही आत्महत्या केली, पण ते समोर आले नाहीत. माझ्या लेकीसह दोघी गेल्या, पण दुसऱ्यांच्या तरी वाचवा हो.. अश्रू ढाळत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिणाऱ्या बीडमधील कोयना विटेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कोयना विटेकर यांचा प्रेमविवाह. त्यांची मोठी मुलगी साक्षी कांबळे ही बीडमधील केएसके महाविद्यालयात कला शाखेच्या तृतीय शाखेत शिक्षण घेत होती. हवाईसुंदरी होण्याचे तिचे स्वप्न होते. पण बीडमधीलच अभिषेक कदम याने तिला ब्लॅकमेल केले. याला कंटाळून तिने मामाच्या गावी जाऊन धाराशिवमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अभिषेक आणि त्याची पोलिस बहीण शीतल कदम यांच्यावर ॲट्रॉसिटीसह इतर कलमान्वये गुन्हाही दाखल झाला. परंतु उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी आरोपीला अभय देऊन त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचाही आरोप कोयना यांनी केला आहे.

आरोपींसह डीवायएसपींवर कारवाई करामाझ्या मुलीचा जीव घेणाऱ्या अभिषेक आणि शीतल कदम यांना कठोर शिक्षा द्यावी. त्यांना फाशी झाली पाहिजे. तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि आम्ही विचारणा करण्यास गेल्यावर उद्धट वर्तन करून बाहेर हाकलणाऱ्या उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्यावर कारवाईची मागणीही काेयना यांनी केली आहे.

त्या दोघींचे नावेही माहितीमाझ्या साक्षीप्रमाणेच केएसके महाविद्यालयातील इतर दोन मुलींनीदेखील छेडखानीला कंटाळून आत्महत्या केली. परंतु त्यांचे नातेवाईक समोर येत नाहीत. त्यांची नावे मला साक्षीने सांगितले होते. एक बीड शहरातील असून दुसरी ग्रामीण भागातील आहे. छेडखानी करणारी टोळीच सक्रिय आहे.

बीडच्या एसपींना भेटणारअभिषेक कदमसह इतर छेडखानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आपण बीडच्या पोलिस अधीक्षकांना मंगळवारी भेटणार आहोत. त्यांना सर्व पुरावे देणार असल्याचेही कोयना यांनी सांगितले.

बीड पोलिसांचा धाकच नाहीमागील काही दिवसांपासून जिल्ह्यात खून, मारामारी, अत्याचार, छेडछाड असे अनेक गंभीर गुन्हे वाढत आहेत. पोलिसांचा धाक नसल्यानेच आरोपींचे मनोबल वाढत आहे. पोलिस अधीक्षक बदलले तरी जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी झालेली नाही. बीड पोलिसांचा नाकर्तेपणा या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड