मस्ट बातमी - फोटो

By Admin | Updated: October 9, 2014 00:39 IST2014-10-08T23:51:14+5:302014-10-09T00:39:10+5:30

उद्योजकाची रोल्सरॉईस बनली प्रचाराचा मुद्दा

Must News - Photo | मस्ट बातमी - फोटो

मस्ट बातमी - फोटो


राजेश खराडे ,बीड
विधानसभा निवडणुकींचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले. प्रत्येक मतदार संघातील उमेदवार प्रचारासाठी जंगजंग पछाडत आहे. यावेळी उमेदवारांना अत्यंत कमी वेळ प्रचारासाठी मिळाला. यामुळे चाणाक्ष उमेदवारांनी हायटेक प्रचाराचा फंडा राबवून शेवटच्या मतदारापर्यंत कसे पोहचता येईल? यासाठी सोशल मीडियाचा वापर केलेला आहे. यासाठी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आदींचा वापर केला. याशिवाय नव्याने आलेले तंत्रज्ञान टुडी, थ्री डी सारख्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर चाणाक्षपणे केला आहे.
जागा वावाटपाचा घोळ मिटण्यास झालेला उशीर आणि त्यातूनच प्रत्येक पक्षांनी मांडलेल्या वेगवेगळ्या चुली यामुळे प्रचाराला उशिरा सुरवात झाली. रात्रीचा-दिवस करीत मतदार संघातील प्रत्येक गावात मतदाराशी संवाद साधण्यासाठी पराकष्टा चालू आहेत. उमेदरांनी जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी फेसबुक सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही उमेदवारांनी तर ‘नेटकरी’ भाड्याने लावून प्रचार सुरू केला आहे. मतदार संघातील खेडोपाड्यात कमी वेळात जास्त नागरिकांशी संवाद साधण्याकरिता आता नव्याने नव्याने थ्री डी, व टु डी चा वापर केला जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर प्रचार यंत्रणेने ज्वर वाढला असून विविध माध्यमांद्वारे प्रचार हायटेक झाला आहे. याचाच प्रत्यय म्हणून परळी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे थेट प्रक्षेपण थ्री डीच्या माध्यमातून मोठ्या स्क्रिनवर चौकाचौकातून दाखविले जात आहे. या आत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आकर्षण निर्माण होत असून नागरिकांची सभा पाहण्यास गर्दी होत आहे. हा प्रयोग परळी येथे प्रथमच केला असून शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर, तळपेठ आणि आझाद चौक येथे मोठ्या स्क्रिनवर सभांचे प्रेक्षपण करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या साहय्याने जनतेसमोर जाण्याचा उमेदारांचा प्रयत्न तंत्रज्ञानामुळे कमी वेळेत साध्य होत आहे. आपली धोरणे, विचार व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम बनत आहे. फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप, हाईक याबरोबरच आता नव्याने या थ्रीडीच्या माध्यमातून संवाद साधला जात आहे.

Web Title: Must News - Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.