शेतात थांबलेल्या वृद्धाचा डोक्यात दगड घालून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:36 IST2021-02-09T04:36:56+5:302021-02-09T04:36:56+5:30

केज : शेतात थांबलेल्या ९० वर्षीय वृद्धाचा रस्त्याने निर्वस्त्र अवस्थेत जाणाऱ्या २७ वर्षीय युवकाने मारहाण करून डोक्यात दगड घालून ...

Murder of an old man standing in a field with a stone on his head | शेतात थांबलेल्या वृद्धाचा डोक्यात दगड घालून खून

शेतात थांबलेल्या वृद्धाचा डोक्यात दगड घालून खून

केज : शेतात थांबलेल्या ९० वर्षीय वृद्धाचा रस्त्याने निर्वस्त्र अवस्थेत जाणाऱ्या २७ वर्षीय युवकाने मारहाण करून डोक्यात दगड घालून खून केला. सारणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ८ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता ही घटना घडली. दरम्यान शेजारील शेतकऱ्यांनी आरोपीस पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

केज तालुक्यातील कुंबेफळ येथील ९० वर्षीय वृद्ध शेतकरी बाबूराव जाडकर हे नित्य नियमाप्रमाणे सारणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेतात गेले होते. दुपारी ते शेतात एकटे असल्याचे पाहून निर्वस्त्र अवस्थेतील औरंगपूर येथील २७ वर्षीय युवकाने त्यांच्यावर अचानक हल्ला करत मारहाण केली व त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. हा प्रकार शेजारच्या शेतातील शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीस पकडून त्याची माहिती युसूफ वडगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान त्या वृद्धाचा डोक्यात दगड मारून खून करणाऱ्याचे नाव सतीश जोगदंड असल्याचे व तो तालुक्यातील औरंगपूर येथील असल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्याने हा खून का केला हे पोलीस तपासातच उघड होणार आहे.

Web Title: Murder of an old man standing in a field with a stone on his head