सांगवी पाटण येथे विवाहितेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST2021-02-05T08:22:55+5:302021-02-05T08:22:55+5:30
कडा : चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावत विवाहितेचा छळ करीत तिच्या ...

सांगवी पाटण येथे विवाहितेचा खून
कडा : चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावत विवाहितेचा छळ करीत तिच्या डोक्यात पाठीमागील बाजूला जड वस्तूने मारून खून केल्याची घटना आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे घडली. याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू व सासऱ्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुवर्णा कैलास खिलारे (३०), असे मयत विवाहितेचे नाव आहे. ही घटना २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली होती.
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील सुवर्णा कैलास खिलारे हिचा पती व सासू, सासरे यांनी संगनमत करून चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावला. तिने नकार देताच पती, सासू, सासरे यांनी संगनमत करून तिच्या डोक्यात जड वस्तूने मारल्याने तिला गंभीर इजा झाली. यात तिचा २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी सतीश श्रीराम सुळे (रा. लुखा मसला, ता.गेवराई) यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती कैलास श्रीमंत खिलारे, श्रीमंत नामदेव खिलारे, शकुंतला नामदेव खिलारे (सर्व रा. सांगवी पाटण, ता. आष्टी) यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा २८ जानेवारी रोजी दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, योगेश कुऱ्हाडे करीत आहेत.