अंमळनेरमध्ये खून, चेहरा जाळून मृतदेह झुडपात लपवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:23 IST2021-01-01T04:23:15+5:302021-01-01T04:23:15+5:30

बीड : मानेवर डाव्या बाजूला धारदार शस्त्राने वार करीत चेहऱ्यावर ॲसिड टाकून पूर्ण जाळून मृतदेह झुडपात फेकला. ही घटना ...

Murder in Amalner, face burnt and body hidden in bushes | अंमळनेरमध्ये खून, चेहरा जाळून मृतदेह झुडपात लपवला

अंमळनेरमध्ये खून, चेहरा जाळून मृतदेह झुडपात लपवला

बीड : मानेवर डाव्या बाजूला धारदार शस्त्राने वार करीत चेहऱ्यावर ॲसिड टाकून पूर्ण जाळून मृतदेह झुडपात फेकला. ही घटना पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे बुधवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी अंमळनेर ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. चेहरा जळालेला असल्याने ओळख पटविताना पोलिसांना कसरत करावी लागली.

दिलीप विठ्ठल साबळे (४७, रा. साबळेवाडी, ता.शिरूर) असे मयताचे नाव आहे. मागील १० दिवसांपासून साबळे बेपत्ता होते. नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला; परंतु ते मिळाले नाहीत. बुधवारी सायंकाळच्या सुमारास अंमळनेरमधीलच एका पेट्रोल पंपाच्या बाजूला कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह दिसला. याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर याची तपासणी केली असता मानेवर डाव्या बाजूला तीक्ष्ण हत्याराचे वार होते. तसेच चेहऱ्यावरही ॲसिड टाकून पूर्णपणे जाळण्यात आला होता. त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते; परंतु तांत्रिक पद्धतीने थोडा सुगावा मिळाल्यानंतर मृतदेहाच्या पायाला जखम दिसली. त्यानंतर मयताच्या आईने त्यांना ओळखले. त्यामुळे ओळख पटली. वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर बडे यांनी जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन केले. या प्रकरणात पोलीस कर्मचारी आरसूळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. अद्याप तरी पोलिसांच्या हाती मुख्य आरोपी लागलेला नाही; परंतु अनेकांची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Murder in Amalner, face burnt and body hidden in bushes