नगरपालिका, पंचायत कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST2021-04-02T04:35:24+5:302021-04-02T04:35:24+5:30
बीड : नगरपालिका व पंचायत कार्यालयातील सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार व इतर कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन होत नसल्याने कर्मचारी आक्रमक ...

नगरपालिका, पंचायत कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज
बीड : नगरपालिका व पंचायत कार्यालयातील सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार व इतर कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन होत नसल्याने कर्मचारी आक्रमक झाले होते. प्रशासनाचा निषेध म्हणून गुरुवारी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. जिल्हाभरात याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मागील काही महिन्यांपासून राज्यातील नगर परिषद व पंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा कायम पुढे येत आहे. काम करूनही वेळेवर वेतन होत नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ येत आहे. वेतनासह इतर मागण्यांसंदर्भात शासनस्तरावरून निर्णय झालेला असतानाही आयुक्त तथा संचालक कार्यालयाकडून यावर कसलीच कार्यवाही केली जात नाही. याला आता कर्मचारी वैतागले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन थेट कोषागार कार्यालयामार्फत करण्यात यावे. शिवाय सर्व कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणाली लागू करावी, यासारख्या विविध मागण्यांना घेऊन गुरुवारी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. जिल्ह्यात याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बीड नगर पालिकेतील आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष महादेव गायकवाड, प्रशांत ओव्हाळ, भागवत जाधव, रावसाहेब गंगाधरे, बंडू वडमारे, राम शिंदे, लखन प्रधान, आर. एस. जोगदंड, राजू वंजारे, मुन्ना गायकवाड, भारत चांदणे आदींची उपस्थिती होती.
१ मे रोजी कामबंद आंदोलन
१ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. आता दुसऱ्या टप्यात १५ एप्रिल रोजी एक दिवस लेखणी व कामबंद आंदोलन केले जाणार आहे. त्यावरही कार्यवाही न झाल्यास १ मे राेजी बेमुदात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
===Photopath===
010421\012_bed_12_01042021_14.jpeg
===Caption===
बीड पालिकेत आंदोलन करताना संघटनेचे पदाधिकारी, कामगार व कर्मचारी दिसत आहेत.