१०१ दिव्यांगांना नगर पालिकेकडून निधी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:04 IST2021-02-28T05:04:31+5:302021-02-28T05:04:31+5:30

: येथील नगरपरिषदेंतर्गत धारूर शहरातील १०१ दिव्यांग व अंपग लाभार्थ्यांना ५ टक्के निधी एकूण एक लाख एक हजार ...

Municipal Corporation distributes funds to 101 persons with disabilities | १०१ दिव्यांगांना नगर पालिकेकडून निधी वाटप

१०१ दिव्यांगांना नगर पालिकेकडून निधी वाटप

: येथील नगरपरिषदेंतर्गत धारूर शहरातील १०१ दिव्यांग व अंपग लाभार्थ्यांना ५ टक्के निधी एकूण एक लाख एक हजार रूपये नगराध्यक्ष डाॕॅ. स्वरूपसिंह हजारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, नगरसेवक बाळासाहेब सोनटक्के, शेख गफार भाई यांची प्रमूख उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्ष डाॕॅ. हजारी यांनी अंपग व दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजन प्रभावीपणे राबवण्याचा व ख-या गरजूंना लाभ देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही दिली. या प्रसंगी कार्यालय अधीक्षक संजय जुजगर, नितीन इजाते, सहा. प्रकल्प अधिकारी किरण नेहरकर, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे, तालुका उपाध्यक्ष ज्ञानदिप शिनगारे, लाभार्थी अशोक सोनटक्के, प्रमोद देशपांडे, भगवान तट, महादेव शिर्के, लिंबाजी शिनगारे, बाबासाहेब शेळके, नितीन गोंदणे, सचीन अंधारे, दत्ता शिर्के, विजयमाला ठोंबरे, चंद्रकला गायकवाड, जगदीश गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Municipal Corporation distributes funds to 101 persons with disabilities