शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या महिला पोलिसाला मिळाली लिंगबदल शस्त्रक्रियेची परवानगी, उच्च न्यायालयानं म्हटलं हा मुलभूत अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 17:21 IST

बीडची महिला पोलीस हवालदार ललिता साळवे हिला लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देबीडची महिला पोलीस हवालदार ललिता साळवे हिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मुंबई - बीडची महिला पोलीस हवालदार ललिता साळवे हिला लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. लिंग बदल शस्त्रक्रिया ही मुलभूत अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले. लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेसाठी सुट्टी देण्याची जबाबदारी मॅटची असल्याचे न्यायालयाने सांगितले. 

लिंगबदलासाठी एक महिन्याची सुटी मिळावी, तसेच त्यानंतर महिला कोट्यातून मिळालेली नोकरी नियमित करावी, यासाठी बीडची महिला पोलीस हवालदार ललिता साळवे हिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.  ललिता साळवीने (२८) लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याची सुट्टी मागितली होती. मात्र, बीड पोलीस अधिक्षकांनी सुट्टी देण्यास नकार दिला. तसेच तिला ही शस्त्रक्रिया करता येणार नाही, असेही स्पष्टपणे सांगितले. 

त्यामुळे साळवेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. ललिता ही २००९ मध्ये हवालदार म्हणून पोलीस दलात भरती झाली. सुट्टी मिळवण्याचा अर्ज मंजूर होण्यापूर्वीच तिने नोटाराईज करून नाव ललिता ऐवजी ललित साळवे लावण्यास सुरुवात केली आहे.

म्हणून लिंग बदलाचा निर्णयललिताची २३ जूनला जे.जे. रूग्णालयामध्ये शारिरीक चाचणीसाठी भरती झाली. वैद्यकीय चाचणीत तिच्यामध्ये वाय या पुरूषी गुणसूत्रांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले. तिने मानोसपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करून घेतले. तिला जेंडर डायसोफोरिया असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लिंग बदलाचा निर्णय घेतला.

- तिने शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याची सुट्टी मिळावी, यासाठी वरिष्ठांकडे केलेला अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे बीडच्या पोलिसांनी तिला सांगितले.  वरिष्ठांचा हा निर्णय याचिकाकर्तीच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.                                                    

Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com

टॅग्स :Policeपोलिस