Mucormycosis : कौतुकास्पद ! उपचारासाठी डॉक्टरांनीच केली रूग्णांला एक लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 15:45 IST2021-05-27T15:43:59+5:302021-05-27T15:45:55+5:30
Mucormycosis : एवढेच नव्हे तर भविष्यातही आणखी मदतीची तयारी डॉ. पोतदार यांनी दर्शविली आहे.

Mucormycosis : कौतुकास्पद ! उपचारासाठी डॉक्टरांनीच केली रूग्णांला एक लाखांची मदत
अंबाजोगाई : आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी रुग्णास पुढील उपचारासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.नितीन पोतदार यांनी एक लाख रुपयांची मदत करून उपचारासाठी दिलासा दिला.
होळ येथील अल्प भूधारक शेतकरी चंद्रकांत शिंदे हे म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराशी लढा देत आहेत. आतापर्यंत या गरीब कुटुंबाचा उपचारावर साडेचार लाखांचा खर्च झाला आहे, तरीदेखील उपचारासाठी आणखी जास्त खर्च अपेक्षित आहे. याबद्दल माहिती मिळाल्यानंतर अंबाजोगाई येथील 'आधार डायग्नोस्टिक'चे संचालक डॉ. नितीन पोतदार यांनी सामाजिक भावनेतून या रुग्णाच्या उपचारासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. सदर रकमेचा धनादेश चंद्रकांत यांच्या पत्नी उमा शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. एवढेच नव्हे तर भविष्यातही आणखी मदतीची तयारी डॉ. पोतदार यांनी दर्शविली आहे.