अनधिकृत वीज रोहित्र उभारून महावितरणलाच गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:24+5:302020-12-29T04:32:24+5:30

गेवराई : महावितरणच्या विजेची चोरी करण्यासाठी तालुक्यातील निपाणी जवळका येथील १० ते १५ जणांनी नवीन शक्कल लढविली असल्याचे ...

MSEDCL was ruined by setting up unauthorized power plants | अनधिकृत वीज रोहित्र उभारून महावितरणलाच गंडविले

अनधिकृत वीज रोहित्र उभारून महावितरणलाच गंडविले

गेवराई : महावितरणच्या विजेची चोरी करण्यासाठी तालुक्यातील निपाणी जवळका येथील १० ते १५ जणांनी नवीन शक्कल लढविली असल्याचे समोर आले आहे. सिंगल फेजचे २५ केव्ही क्षमतेचे अनधिकृत वीज रोहित्र उभारुन त्याआधारे महावितरणच्या नेटवर्कला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सर्व प्रकार महावितरण अधिकाऱ्यांना समजल्यानंतर या प्रकरणात १५ जणांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

गेवराई महावितरणचे उपकार्यकारी अभियंता बालाजी शिवनकर यांनी फिर्याद दिली. १४ डिसेंबर रोजी निपाणी जवळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात त्यांना एक अनधिकृत सिंगल फेजचे २५ केव्ही क्षमतेचे रोहित्र उभारलेले दिसून आले. याबाबत माहिती जाणून घेतली असता गेवराई महावितरणकडून ते रोहित्र उभारलेले नसल्याचे स्पष्ट झाले. अनधिकृत रोहित्र उभारुन त्याआधारे महावितरणची वीजचोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर सागरे, बाबूराव पवार, संजय सागरे, आप्पासाहेब धायरे व इतर १० ते १५ जणांवर (सर्व रा. निपाणी जवळका) भारतीय विद्युत कायद्याच्या कलमानुसार गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: MSEDCL was ruined by setting up unauthorized power plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.