एमपीएससी परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:20+5:302021-03-13T04:58:20+5:30
बीड : कोरोना काळात चार वेळेस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता पुन्हा एकदा असाच निर्णय घेतल्याने ...

एमपीएससी परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांचा आक्रोश
बीड : कोरोना काळात चार वेळेस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता पुन्हा एकदा असाच निर्णय घेतल्याने बीडमधील विद्यार्थी आक्रमक झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त केला.
मागील वर्षभरापासून राज्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. याला नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनही केले होते. याच काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही रद्द झाल्या होत्या. परंतु मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन उघडले आणि विद्यार्थी नव्या जोमाने स्पर्धा परीक्षा अभ्यासाला लागले. परंतु आता आणखी एकदा शासनाने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन घ्यायला जमते मग विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा काय अडथळा, असा सवाल उपस्थित करीत विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो विद्यार्थी जमा झाले होते. यावेळी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीला मागण्यांचे निवेदन दिले.
===Photopath===
110321\112_bed_26_11032021_14.jpeg
===Caption===
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात जमलेले विद्यार्थी.