वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:32 IST2021-03-06T04:32:05+5:302021-03-06T04:32:05+5:30
देशातील केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०२० रोजी शेतकऱ्यांविरोधात तीन काळे कायदे तयार केले आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान ...

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर आंदोलन
देशातील केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०२० रोजी शेतकऱ्यांविरोधात तीन काळे कायदे तयार केले आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या तीन कायद्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये सतत आंदोलनात्मक भूमिका घेत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतली आहे की जोपर्यंत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले तीन कायदे रद्द करत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार आहे. ५ मार्च रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी बीडच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे. जिल्हा उपाध्यक्ष संतोष जोगदंड, खंडू जाधव, अजय सरवदे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश ढवळे, युनुस शेख, अशोक कातखडे, दगडू गायकवाड, केशवदास वैष्णव, अनुरथ वीर, किरण वाघमारे, चेतन पवार, विश्वजीत डोंगरे, मिलिंद सरपते, आकाश साबळे, लखन जोगदंड, उमेश तुळवे आदी उपस्थित होते.
===Photopath===
050321\052_bed_23_05032021_14.jpg
===Caption===
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन