माजलगावात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:28+5:302021-06-23T04:22:28+5:30
माजलगाव : माजलगाव शहरासह परिसरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील आठवड्यात आठ मोटारसायकल चोरी गेल्याची ओरड ...

माजलगावात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले
माजलगाव : माजलगाव शहरासह परिसरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील आठवड्यात आठ मोटारसायकल चोरी गेल्याची ओरड होत असून यातील काहींनी पोलिसांकडे धाव घेऊन पोलिसात नोंद केली आहे. काहींनी पोलिसात जाऊन काहीच उपयोग होत नाही म्हणून झालेले नुकसान सहन करत घरीच बसणे पसंत केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान संपूर्ण शहरावर सीसीटीव्हीची नजर असूनही मोटारसायकल चोरांवर नियंत्रण येत नसल्याचे दिसून येत आहे.
माजलगाव शहरासह आजूबाजूच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोटारसायकल चोरी जात असल्याचे प्रमाण आहे. याबाबत पोलिसांचा तपास निष्क्रिय असल्यामुळे अशा घटना वाढत असल्याचे लोकांमधून ऐकायला मिळते. दरम्यान या बाबीचा प्रत्येक या आठवड्यात येताना दिसत आहे. कारण या आठवड्याच्या आठ दिवसांत शहर परिसरातून तब्बल आठ मोटारसायकल गाड्या चोरी गेल्याची माहिती मिळत आहे. यातील काही मोटारसायकल रहदारीच्या चौकातून गेल्या असून काही गाड्या नागरिकांच्या राहत्या घरासमोरून गेला असल्याचे ऐकायला मिळते. या सर्व घटना शहरात जवळपास ४३ कॅमेऱ्याची नजर बसवली असूनही पोलिसांना मोटारसायकल चोर शोधता येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर मोटारसायकल चोरांना जेरबंद करण्याची गरज आहे.
-----
व्हिल लाॅकचा वापर करावा
गेल्या काही महिन्यांपासून माजलगाव शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना दिवसेनदिवस घडत आहेत. या चोरीच्या घटना रोखण्यासाठी मोटारसायकल चालकांनी आपल्या मोटारसायकलच्या पुढच्या चाकाला व्हिल लाॅकचा वापर करावा ज्यामुळे मोटारसायकल चोरीत घट होऊ शकते.
-- धनंजय फराटे, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन माजलगाव