शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

फळपीक विमा योजनेत पाचशेहून अधिक प्रस्ताव ठरविले अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 17:06 IST

दुष्काळी परिस्थिती किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतक-यांना मदत मिळावी यासाठी पिकविमा व फळपिक विमा योजना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवली जाते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे नुकसान : विमा कंपनीने रिमोट सेन्सिंगद्वारे केली क्षेत्र तपासणी

- प्रभात बुडूख बीड : दुष्काळी परिस्थिती किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतक-यांना मदत मिळावी यासाठी पिकविमा व फळपिक विमा योजना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवली जाते. तसेच या योजनेत अधिकाधिक शेतक-यांनी सहभागी व्हावे यासाठी शासनाच्या वतीने देखील प्रयत्न केले जातात. मात्र यावर्षी फळपिक विमा योजनेत रिमोट सेन्सिंगद्वारे क्षेत्राची तपासणी केल्यामुळे, पाचशेहून अधिक शेतकरी अवैध ठरले आहेत. त्यामुळे शेतक-यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

देशभरातच पीक विमा योजना वादाचा विषय बनू लागली असतानाच बीड जिल्हयात मोसंबी आणि संत्रा या फळ पिकांचा विमा भरलेले ५०० हून अधिक शेतक-यांचे प्रस्ताव विमा कंपनीने अवैध ठरवले आहेत. रिमोट सेन्सिंग आणि प्रत्यक्ष फळलागवड केलेले शेत पाहणी केल्यानंतर, प्रत्यक्षात फळपिके न दिसल्याने टाटाएआयजी या कंपनीने शेतकरी फळपिक विम्यातून वगळून अवैध ठरवण्याचा निर्णय घेतला आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात यंदा तीव्र दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता पिकविमा भरण्याचे अवाहन शेतकºयांना करण्यात आलेले होते. यामध्ये हवामान आधारित फळपिक विमा योजनेत बीड जिल्ह्यातील संत्रा पिकासाठी २१३ तर मोसंबीसाठी ९६३ शेतकºयांनी विमा भरला होता. कंपनीने विम्याचा हप्ता भरुन घेतल्यानंतर आता प्रत्यक्षात फळलागवड क्षेत्र आहे का नाही यासाठी रिमोट सेन्सिंग आणि प्रत्यक्ष शेतपाहणी केली, या पाहणीनंतर आलेल्या अर्जापैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे अवैध ठरविली आहेत.

टाटाएआयजी कंपनीने या संदर्भातील एक अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला आहे, त्यानुसार रिमोट सेन्सिंग मध्ये १७७ प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत, यावेळी प्रत्यक्षात फळलागवडीखालील क्षेत्रभेटीत ६९, लागवड नसणे ५, फळधारणा नसणे ४९, कमी क्षेत्र १५ आणि दुबार नोंदीचे २३९ प्रस्ताव असल्याचे म्हटले आहे. या सर्व प्रस्तावांची विमा नोंदणी नाकारण्याचा प्रस्ताव विमा कंपनीने प्रशासनाकडे दिला आहे. त्यामुळे शेतक-यांना योग्य माहिती न देता विमा भरुन घेतला जात असून, विमा कंपनीकडून शेतक-यांची फसवणूक होत असल्याची भावना शेतक-यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :BeedबीडfruitsफळेCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी