विविध मागण्यांसाठी कुंभार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST2021-01-08T05:47:23+5:302021-01-08T05:47:23+5:30
(फोटो ) बीड : बारा बलुतेदारांसाठी रोहिणी आयोगाने स्वतंत्र नऊ टक्के आरक्षण द्यावे, अशी शिफारस केलेली आहे. ही प्रलंबित ...

विविध मागण्यांसाठी कुंभार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
(फोटो )
बीड : बारा बलुतेदारांसाठी रोहिणी आयोगाने स्वतंत्र नऊ टक्के आरक्षण द्यावे, अशी शिफारस केलेली आहे. ही प्रलंबित मागणी केंद्राने पूर्ण करावी, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून मूर्ती तयार करण्यासाठी घातलेली बंदी तत्काळ उठवावी यासह अन्य मागण्यांसाठी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र संघटनेच्या वतीने कुंभार समाजाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कुंभार समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आणि राजकीय क्षेत्रात उन्नती होण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने न्याय द्यावा. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती तयार करण्यावर घातलेली बंदी तत्काळ उठवावी, बारा बलुतेदारांसाठी रोहिणी आयोगाने स्वतंत्र नऊ टक्के आरक्षण द्यावे, ही प्रलंबित मागणी केंद्राने पूर्ण करावी, संत गोरोबाकाकांचे जन्मस्थान उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी या तीर्थक्षेत्राला ‘अ’ दर्जा देऊन या ठिकाणी पर्यटन विभागाकडून विविध विकासकामे करण्यात यावी. माती वाहतूक व वीटभट्टी परवान्यांच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, कुंभार समाजात ओळखपत्रावर परवाना मिळावा, कुंभार समाजातील ६० वर्षांपेक्षा ज्येष्ठ कारागिरांना शासनाकडून मानधन मिळावे आदी प्रलंबित मागण्यांसाठी हा ‘थापटन’ मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिला. याावेळी जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे, गेवराई तालुकाध्यक्ष रमेश जाधव, राम जाधव, जालिंदर रेळेकर, लक्ष्मण वाडेकर, अनिल देवतरासे, अशोक राऊत, मनोहर इटकर, राम पोपळे, गौतम चित्रे, अॅड. शिवराज कुंभार, उत्तरेश्वर तडसकर, विठ्ठल गोरे, रावसाहेब देशमुख यासह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि कुंभार समाजबांधव आणि बारा बलुतेदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.