उद्या एकपात्री नाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:22+5:302021-01-08T05:48:22+5:30

बीड : येथील बंकटस्वामी महाविद्यालयात ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मी सावित्री बोलतोय या एकपात्री प्रयोगाचे आयोजन केले ...

Monologue tomorrow | उद्या एकपात्री नाटक

उद्या एकपात्री नाटक

बीड : येथील बंकटस्वामी महाविद्यालयात ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मी सावित्री बोलतोय या एकपात्री प्रयोगाचे आयोजन केले आहे. ॲड. हेमा पिंपळे या हा प्रयोग सादर करतील. उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयातील महिला कक्ष तसेच प्राचार्यांनी केले आहे.

कमी दाबाने पाणी

बीड : शहरातील ईदगाह पाणी टाकी ते कनकालेश्वर मंदिर, नाळवंडी रोड, तेलगाव नाकापर्यंत मुख्य पाईपलाईनवर काही नागरिकांनी नळजोडणी केली असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ही नळजोडणी बंद करावी, अशी मागणी नगरसेविका शेख बिसमिल्लाह आणि हाफीज अशफाक यांनी केली आहे

महिलांचा सत्कार

बीड : बानाई महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजीपाला विक्रेत्या महिलांचा सत्कार, मास्क वाटप व विधवा महिलांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. हेमा पिंपळे, शिवराज बांगर, सुमित्रा उबाळे, वृंदावनी गिरी, राखी धवल, राणी शेख, रेखा वरकटे आदी उपस्थित होते.

जयंती कार्यक्रम

बीड : येथील के. एस. पी. विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष तुपे, प्रमुख पाहुणे कांबळे, प्र. मुख्याध्यापक शिंदे, संस्था अध्यक्षा अंजली शेळके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

बीडमध्ये मॉर्निंग वाॅकला गर्दी

बीड : आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्यात व्यायाम करणाऱ्यांची तसेच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शहरातील चऱ्हाटा रोड, पालवण रोड, जालना रोड, खंडेश्वरी मैदान परिसरात पहाटेपासूनच वयस्कर पुरुष, महिला, युवक व युवतींचे जत्थे गर्दी करू लागले आहेत.

अभिवादन कार्यक्रम

बीड : बीड विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थापक अध्यक्ष किस्किंदा पांचाळ यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उत्तम ओव्हाळ, आत्माराम व्हावळ, संजय शिरसट,भास्कर जावळे, मंदा पायाळ, लक्ष्मी गुरुकुल, शोभा वीर, ऋतुजा सोनवणे, गणेश माने, किशोर सोनवणे, कल्पना जाधव आदी उपस्थित होते.

शेतकरी हवालदिल

बीड : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोमवारी बीड परिसरात भुर्रभुर्र झाली. हे वातावरण गहू, हरभरा या पिकांसाठी पोषक नसून, नुकसानीची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. ज्वारीच्या पिकावरही मावा, तसेच चिकटाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Web Title: Monologue tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.