मोकाट गुरांमुळे वाहतुकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:38 IST2021-01-16T04:38:16+5:302021-01-16T04:38:16+5:30
वाहतूक सुसाट; अपघातांत होतेय वाढ अंबाजोगाई : शहरात मुख्य रस्त्यावरून दुचाकी वाहने सुसाटपणे चालविली जात आहेत. परिणामी, लहान-मोठ्या अपघातांच्या ...

मोकाट गुरांमुळे वाहतुकीस अडथळा
वाहतूक सुसाट; अपघातांत होतेय वाढ
अंबाजोगाई : शहरात मुख्य रस्त्यावरून दुचाकी वाहने सुसाटपणे चालविली जात आहेत. परिणामी, लहान-मोठ्या अपघातांच्या घटना वाढत आहेत. १९ वर्षांखालील अनेक मुले व मुली यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वेगात वाहन चालवितात. प्रादेशिक परिवहन विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सुजाण नागरिकांमधून केली जात आहे.
कॅशलेस व्यवहारात वाढ
अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला अंबाजोगाई शहर व परिसरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी आपले व्यवहार कॅशलेस करण्यावर भर दिला आहे.
हातपंप दुरुस्त करावेत
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे पाणीपुरवठा करण्यासाठी असलेले हातपंप अनेक वर्षांपासून बंद आहेत. वेळोवेळी मागणी करूनही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. दुरुस्तीची मागणी सरपंच विक्रम खंडागळे यांनी केली.