शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

बीडमध्ये व्यापाऱ्याला चिरडणा-या आर्या गँगवर ‘मोक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:40 IST

कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात खून दरोडे, खंडणी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणा-या कोल्हापुरच्या आर्या गँगवर बीड पोलिसांच्या प्रस्तावाच्या आधारे मोक्का लावण्यात आला.

ठळक मुद्देमहाराष्ट्रासह कर्नाटकात खून, दरोडे, खंडणीसारखे गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात खून दरोडे, खंडणी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणा-या कोल्हापुरच्या आर्या गँगवर बीड पोलिसांच्या प्रस्तावाच्या आधारे मोक्का लावण्यात आला. केज येथील सराफा व्यापाºयाला ठार मारून दागिने लुटल्यानंतर आर्या गँग बीड जिल्ह्यात चर्चेत आली होती. त्यानंतर बीड पोलिसांनी या टोळीच्या म्होरक्यासह चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मोक्का लावण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता.

१४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास केज येथील सराफा व्यापारी विकास गौतम थोरात हे दुकान बंद केल्यानंतर दागिने सोबत घेऊन मोटारसायकलवरून गावाकडे निघाले होते. यावेळी कारमधून आलेल्या अमोल उर्फ आर्या संभाजी मोहिते (वय २६, रा. हसूर, ता. कागल, कोल्हापूर), अमर लक्ष्मण सुतार (वय ३९, रा. निपाणी, बेळगाव, कर्नाटक), महादेव रमेश डोंगरे (वय १९, सोनीजवळा, ता. केज) आणि अतुल रमेश जोगदंड (रा. सोनीजवळा, ता. केज) या चोघांनी थोरात यांना पाठीमागून धडक दिली आणि त्यांच्या जवळील दागिन्याची पिशवी घेऊन पळ काढला. या घटनेत थोरात यांचा जागीच मृत्यू झाला.

मात्र, काही तरुणांच्या धाडसामुळे सदरील चारही आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले. हे सर्व आरोपी कुख्यात आर्या गँगचे सदस्य असून अमोल मोहिते हा टोळीचा म्होरक्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले. तो नेहमी वेगवेगळ्या साथीदारांना सोबत घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात खून, दरोडे, चोºया, घरफोड्या खंडणी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असे. त्याच्यावर दोन्ही राज्यात एकूण २० गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवर केज येथे दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम वाढविण्यासाठी केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक हुंबे यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करून विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर विचार होऊन भारंबे यांनी सदर टोळीवर मोक्का लावण्यास मंजुरी दिली.आर्या पडला विहिरीतथोरात यांना मारल्यानंतर गँगचा म्होरक्या अमोल उर्फ आर्या हा धावताना विहिरीत पडला होता. तो पोलिसांच्या हाती लागल्यामुळेच संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना अवघ्या चार तासांत यश आले. या गँगवर कोल्हापुरमध्येही मोका लागलेला आहे. ही गँग कुख्यात असून सर्वत्र दहशत आहे.

यांची कामगिरी महत्त्वपूर्णया संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे, वैभव कलूबर्मे, उपअधीक्षक मंदार नाईक, गुन्हे शाखेचे निरीक्षक घनशाम पाळवदे, शिरीष हुंबे आणि केज पोलिसांची भूमिका महत्वाची ठरली. भविष्यातही गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अन्वये कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिला आहे.

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडाRobberyदरोडा