वाहनावर मोबाइलचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:25+5:302021-07-01T04:23:25+5:30

------------------------ शेतात काम करताना काळजी घ्यावी अंबेजोगाई : खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतीच्या कामात व्यस्त ...

Mobile usage on the vehicle increased | वाहनावर मोबाइलचा वापर वाढला

वाहनावर मोबाइलचा वापर वाढला

Next

------------------------

शेतात काम करताना काळजी घ्यावी

अंबेजोगाई : खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतीच्या कामात व्यस्त आहेत, परंतु पावसाने शेतात दडलेले साप, विंचू व सरपटणारे प्राणी बाहेर पडत असतात. परिणामी, त्यांच्यापासून धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतात काम करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन भावठाणा येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद यादव यांनी केली आहे.

-----------------------------

‘बेरोजगारांसाठी शिबिरे घ्यावीत’

अंबेजोगाई : कोरोनामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत, तसेच शासनाकडून कोणतीही शासकीय भरती प्रक्रिया राबविण्यात येत नसल्याने, बेरोजगारांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे बेरोजगारांसाठी रोजगाराभिमुख शिबिर राबवून मार्गदर्शन करावे, अशी मागणी बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी केली आहे.

-----------------------------

विमा योजनेबाबत जनजागृती करावी

अंबेजोगाई : कोरोनामुळे अनेक कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या कुटुंबावर अनेक अडचणी कोसळल्या. असे प्रकार टाळण्यासाठी शासकीय विमा योजनाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. शासनातर्फे विमा योजना राबविण्यात येतात. मात्र, त्याची व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात आली नाही. परिणामी, अनेकांना या योजनेबाबत माहितीच नाही.

---------------------------

आरटीओ कार्यालयात परवान्यासाठी गर्दी

अंबेजोगाई : कोरोनामुळे अनेकांना परमनंट लायसन्स काढता आले नाही. अशांना ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे अंबेजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परवाना काढण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सर्वाचे तापमान तपासूनच कार्यालयात प्रवेश देण्यात येत आहे. विनामास्क असणाऱ्यांचा प्रवेश नाकारण्यात येत आहे.

--------------------------

पासबुक प्रिंटिंग मशीन नादुरुस्त

अंबेजोगाई : शहरातील अनेक बँकांतील पासबुक प्रिंटिंग मशीन बंद आहेत. त्यामुळे पासबुकवर जमा-खर्चाची नोंद होत नाही. परिणामी, नागरिकांना जमा-खर्चाची माहिती मिळणे कठीण झाले आहे. ऑनलाइन व्यवहार वाढल्याने बहुतेक जण बँकेत जात नाही, परंतु आपल्या खात्यातील जमा खर्चाची माहिती असावी, यासाठी पासबुकवर नोंद घेतात. शहरातील अनेक बँकांतील पासबुक प्रिंटिंग मशीन बंद आहेत.

--------------------------

मैदानी खेळांबाबत जनजागृती

अंबेजोगाई : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असायचे. मात्र, सध्या मुले मैदानी खेळ खेळताना दिसत नाहीत. मोबाइल गेमने हा ट्रेंड बदलवून टाकला आहे. आता मुले मोबाइलवरच विविध खेळ खेळताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मैदानी खेळांची गरज आहे.

Web Title: Mobile usage on the vehicle increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.