मोबाइल रेंज मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:25 IST2021-01-10T04:25:50+5:302021-01-10T04:25:50+5:30

बाजारतळ दुरवस्था बीड : तालुक्यातील चौसाळा येथील बाजारतळाची दुरवस्था झाली असून, नागरिकांची, व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बाजारतळ व्यवस्थित ...

Mobile range not found | मोबाइल रेंज मिळेना

मोबाइल रेंज मिळेना

बाजारतळ दुरवस्था

बीड : तालुक्यातील चौसाळा येथील बाजारतळाची दुरवस्था झाली असून, नागरिकांची, व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बाजारतळ व्यवस्थित करण्याची मागणी चौसाळा येथील विशाल तोडकर, नवसेकर आदींनी केली.

दारू विक्री बंद करा

आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी महिलांनी केली आहे.

रस्त्याची दुर्दशा

बीड : तालुक्यातील चौसाळा गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, पूर्वी हा महामार्ग होता; मात्र बायपास झाल्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.

डासांचे प्रमाण वाढले

अंबाजोगाई : शहर व नव्याने विकसित होत असलेल्या सिल्वरसिटी परिसरात अद्याप नाल्याचे बांधकाम न झाल्याने पाण्याचे डोह साचल्याने डास झाले आहेत. यामुळे त्रास आहे.

Web Title: Mobile range not found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.