आ. बाळासाहेब आजबे यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 19:28 IST2021-03-16T19:26:44+5:302021-03-16T19:28:46+5:30

संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घेण्याचे केले आवाहन 

MLA Balasaheb Ajbe infected with corona virus | आ. बाळासाहेब आजबे यांना कोरोनाची लागण

आ. बाळासाहेब आजबे यांना कोरोनाची लागण

आष्टी : आ. बाळासाहेब आजबे यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. आ. आजबे यांची अँटिजन टेस्ट केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. 

मागील दोन दिवसांपासून आ. बाळासाहेब आजबे यांना अस्वस्थ वाटत होते. यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. यामुळे शिराळ येथील निवासस्थानी त्यांची कोरोनाची अँटिजन चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. दरम्यान, माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, माझी तब्येत चांगली आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन आ. आजबे यांनी केले आहे.

Web Title: MLA Balasaheb Ajbe infected with corona virus