पैशासाठी मिस्त्रीचे अपहरण करून केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:32 IST2021-05-15T04:32:53+5:302021-05-15T04:32:53+5:30

केज : पैशाची मागणी करत केज येथील मोंढ्यातून मिस्त्रीकाम करणाऱ्या युवकाचे अपहरण करून त्यास भायजळी येथे नेऊन मारहाण केली. ...

Mistry kidnapped and beaten for money | पैशासाठी मिस्त्रीचे अपहरण करून केली मारहाण

पैशासाठी मिस्त्रीचे अपहरण करून केली मारहाण

केज : पैशाची मागणी करत केज येथील मोंढ्यातून मिस्त्रीकाम करणाऱ्या युवकाचे अपहरण करून त्यास भायजळी येथे नेऊन मारहाण केली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील मंगळवार पेठेतील बालाजी कल्याण सुरवसे हे मिस्त्री असून, त्यांचे मंगळवार पेठेत चहाचे हॉटेलदेखील आहे. त्यांचे दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता केज येथील मोंढ्यातून उज्ज्वल ऊर्फ दादा मुंडे व अनोळखी आठ जणांनी पैसे का देत नाही, या कारणावरून बालाजी कल्याण सुरवसे यांचे कार क्रमांक (एमएच-४४ जी-९५२)मधून त्यांचे अपहरण करून त्यांना भायजळी (ता. धारूर) येथे उज्ज्वल ऊर्फ दादा मुंडे याच्या शेतात घेऊन गेले व रॉडने मारहाण केली, पुन्हा मित्रांना बोलावून मारहाण करून गंभीर दुखापत केली व शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत डोंगरावरून ढकलून दिले. याप्रकरणी बालाजी कल्याण सुरवसे यांनी केज पोलिसांत उज्ज्वल ऊर्फ दादा मुंडे व अनोळखी आठ जणांविरुद्ध १३ मे रोजी केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास महिला पोलीस नाईक चौरे करत आहेत.

Web Title: Mistry kidnapped and beaten for money