शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील मंत्री रोज सकाळी विचार मांडतात; मात्र जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी एकावरच टीका करतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 17:43 IST

MP Pritam Munde: ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर अध्यादेश हा आतापुरता दिलासा, येणाऱ्या काळातील निवडणुकांचे काय ?

बीड : राज्य सरकारमधील मंत्री रोज सकाळी आपले विचार मांडतात, परंतु लोकांच्या प्रश्नांवर भाष्य करण्याऐवजी ते केवळ एका व्यक्तीवर बोलतात, हे दुर्दैवी आहे अशी खोचक टीका करत खासदार प्रीतम मुंडे ( MP Pritam Munde ) यांनी आज राष्ट्रवादींच्या मंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाना साधला. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सरकारने तातडीने कारवाई करावी, अध्यादेश काढून आतापुरता दिलासा मिळाला आहे. मात्र येणाऱ्या काळातील निवडणुकांचे काय ? (MP Pritam Munde criticizes State Government ) असा सवाल खा. मुंडे यांनी केला. 

खा. प्रीतम मुंडे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आज राज्य सरकारवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या,  भाजपने केलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे राज्य सरकारचे डोळे उघडले आणि त्यांनी ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी अध्यादेश काढला. इम्पिरिअल डेटा मिळणे कठीण काम नाही. परंतु, राज्य सरकारने तारीख पे तारीख केले, यामुळे ओबीसींवर अन्याय झाला. याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. अध्यादेश आताच्या निवडणुकांसाठी लागू असला तरी येत्या काळात पालिका, जिल्हा परिषद अशा संपूर्ण राज्यात निवडणुका आहेत  येणाऱ्या काळात आणखी निवडणुका आहेत. सरकारने यावर तातडीने कारवाई करून न्याय मिळवून द्यावा. आज समाजातील कोणताही घटक राज्य सरकारच्या कामगिरीवर खुश नाही, अशी जोरदार टीकाही खा. मुंडे यांनी यावेळी केले. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सरकारच्या कामगिरीवर लक्ष ठेवून येत्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

राज्याकडून रेल्वेसाठी मदत नाहीबीडच्या रेल्वेसाठी राज्य आणि केंद्र सरकार हे दोघे मदत करणार होते. मात्र,  राज्य सरकारकडून मदत मिळत नाही. आतापर्यंत केंद्राने भरपूर मदत केली, राज्याने केवळ १९ कोटी दिले. राज्य सरकारने निधी द्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. जर निधी उपलब्ध झाला तर २०२४ पर्यंत रेल्वेचे काम पूर्ण होईल असेही त्या म्हणाल्या. 

 विधानपरिषद निवडणुकीत डावलले नाही राज्य विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. यात पंकजा मुंडे यांना पुन्हा डावले गेले का ? असे  खा. प्रीतम मुंडे यांना विचारण्यात आले. यावर या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडणूक येणाऱ्या विधानपरिषद आमदारांच्या आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भातील जागेसाठी मराठवाड्यातील पंकजा मुंडे यांना कसे उभे राहता येणार, असे स्पष्टीकरण खा. मुंडे यांनी दिले.

टॅग्स :Pritam Mundeप्रीतम मुंडेBJPभाजपाOBC Reservationओबीसी आरक्षणPankaja Mundeपंकजा मुंडे