वृक्षारोपणासाठी गुणदान योजना काळाची गरज - दि. ना. फड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST2021-07-27T04:35:21+5:302021-07-27T04:35:21+5:30

महाराष्ट्रात वन मंत्रालय व पर्यावरण मंत्रालयाकडून वृक्षारोपण व संवर्धनासाठी करोडो रुपये खर्च करून शेकडो योजना राबवल्या जात आहेत. १७ ...

Merit Scheme for Tree Planting Time Needed - Dt. No. Phad | वृक्षारोपणासाठी गुणदान योजना काळाची गरज - दि. ना. फड

वृक्षारोपणासाठी गुणदान योजना काळाची गरज - दि. ना. फड

महाराष्ट्रात वन मंत्रालय व पर्यावरण मंत्रालयाकडून वृक्षारोपण व संवर्धनासाठी करोडो रुपये खर्च करून शेकडो योजना राबवल्या जात आहेत. १७ जानेवारीच्या शासनादेशानुसार शालेय शिक्षण विभागाने कला व क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी दहावी-बारावी परीक्षेसाठी ०५ ते २५ गुणांची तरतूद केली आहे. संदर्भीय शासनादेशाच्या धर्तीवर दहावी-बारावी परीक्षेमध्ये शाश्वत वृक्षारोपण व संवर्धनासाठी केवळ ०३ ते ०७ गुणांची योजना घोषित केली तर महाराष्ट्रात एक रुपयाच्या वित्तलब्धीची तरतूद न करता लाखो झाडांची लागवड होऊन पर्यावरण हित साधले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. पर्यावरण हितासाठी या विधायक योजनेबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी शैक्षणिक वर्तुळासह पर्यावरणप्रेमींकडून पाठबळ मिळावं, असे आवाहन सोमेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. उद्धवराव शिंदे, सचिव अजितदादा देशमुख, प्राचार्य दि.ना.फड व शिक्षणप्रेमींनी केले आहे.

Web Title: Merit Scheme for Tree Planting Time Needed - Dt. No. Phad