रोशन सातारकर, शंकरराव घोटकर यांचा स्मृतिदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:36 IST2021-09-26T04:36:14+5:302021-09-26T04:36:14+5:30
मंगळवारी गेवराई येथील कोल्हेर रोडवरील नाईकनगरात कबीरदेव नाट्य, नृत्य, संगीत, गायन, वादन संस्कार अकादमीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ लावणी ...

रोशन सातारकर, शंकरराव घोटकर यांचा स्मृतिदिन
मंगळवारी गेवराई येथील कोल्हेर रोडवरील नाईकनगरात कबीरदेव नाट्य, नृत्य, संगीत, गायन, वादन संस्कार अकादमीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ लावणी गायिका रोशन सातारकर आणि ज्येष्ठ ढोलकी सम्राट शंकर घोटकर गुरुजी यांच्या आठवणींना शाहीर विलास सोनवणे यांनी उजाळा दिला. यावेळी सर्व विद्यार्थी, लोककलावंतांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी ॲड. सुभाष निकम, वाघ्या, मुरळी संघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष शाहीर कैलास टोणपे, तालुकाध्यक्ष अंबादास सातपुते, जागरण गोंधळ परिषदेचे सुधाभाऊ सरोदे, सुप्रसिद्ध दिमडी वादक परमेश्वर पवार रांजणीकर, अमोल कांबळे, अभिषेक काळे, आदर्श मोरे, अश्विनी सोनवणे, प्रा. राजेंद्र बरकसे, शेखरभाऊ मोटे, आनंद दाभाडे, लक्ष्मण उमप, नृत्यदिग्दर्शक दीपक गिरी, गायक गणेश डोंगरेसह अनेक लोककलावंत रसिक उपस्थित होते.