शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'अमर रहे' घोषणांनी गोपीनाथ गड दुमदुमला! लोकनेते मुंडेंच्या जयंतीनिमित्त जनसागर उसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 16:00 IST

शेवटच्या श्वासापर्यंत येत राहू! भावनिक वातावरणात मुंडेप्रेमींनी घेतले समाधीचे दर्शन.

- संजय खाकरेपरळी (बीड): महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज (१२ डिसेंबर) परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गड 'अमर रहे... अमर रहे... गोपीनाथराव मुंडे अमर रहे...' या घोषणांनी दुमदुमून गेला. राज्यभरातून हजारो चाहते सकाळपासूनच गोपीनाथ गडावर दाखल झाले आणि आपल्या लाडक्या नेत्याच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत त्यांनी विनम्र अभिवादन केले. संपूर्ण परिसर मुंडेसाहेबांच्या स्मृतीने भारलेला होता.

गडावर मुंडे कुटुंबाची उपस्थितीयावेळी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माजी कृषिमंत्री व परळीचे आमदार धनंजय मुंडे, बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे आणि प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांनी एकत्र येत समाधीस्थळाचे दर्शन घेतले आणि भजन कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार यांसह अनेक मान्यवर आणि मुंडेप्रेमींची गर्दी होती.

पंकजा मुंडेंची भावनिक सादभजन कार्यक्रमानंतर उपस्थित मुंडेप्रेमींसमोर बोलताना मंत्री पंकजा मुंडे अत्यंत भावुक झाल्या. "लोकनेते गोपीनाथराव मुंडेंवर प्रेम करणाऱ्या जनतेला नतमस्तक होण्यासाठी स्थळाची गरज होती, म्हणून गोपीनाथ गड उभा राहिला. ही निर्मिती माझी नसून जनतेच्या प्रेमाची आहे." त्यांनी पुढे वचन दिले, "आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही गोपीनाथगडावर येत राहू." गोपीनाथरावांनी वंचितांसाठी आयुष्य घालवले, त्यांनी उभं केलेलं कार्य अधिक सुदृढ करण्यासाठी ईश्वर आम्हाला बळ देवो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शिखरशिंगणापूरची 'संघर्ष ज्योत' दाखलगोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. राजेंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली १२ वर्षे अखंडितपणे काढण्यात येणारी शिखरशिंगणापूर ते परळी वैजनाथ संघर्ष ज्योत सकाळी साडेअकराच्या सुमारास गोपीनाथ गडावर पोहोचली. महादेवाला अभिषेक करून प्रस्थान केलेली ही ज्योत घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांचे माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी स्वागत केले. दिवसभर गडावर रक्तदान शिबिर आणि प्रसादाचा कार्यक्रम सुरू होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Gopinath Gad Echoes with Tributes on Munde's Birth Anniversary

Web Summary : Thousands thronged Gopinath Gad, Parli, on Gopinath Munde's birth anniversary. Pankaja Munde and family paid respects. Pankaaja emotionally recalled Munde's work for the downtrodden. 'Sangharsh Jyot' arrived, marking the day with tributes and charity.
टॅग्स :Gopinath Mundeगोपीनाथ मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीड