जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना माउलीने दिले आशीर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:32 IST2021-05-14T04:32:49+5:302021-05-14T04:32:49+5:30

माझी आई भागिरथीबाई मारोतीराव जोशी यांना निमोनियाची लागण झाली असता परळीत कोणत्याही रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. त्यामुळे ...

Mauli blesses the life-saving doctor | जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना माउलीने दिले आशीर्वाद

जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना माउलीने दिले आशीर्वाद

माझी आई भागिरथीबाई मारोतीराव जोशी यांना निमोनियाची लागण झाली असता परळीत कोणत्याही रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. त्यामुळे तेथे उपचार मिळू शकले नाही. मी आईला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात दाखल केले. तेथील औषधी विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार व त्यांच्या टीमने योग्य उपचार करून आईला जीवदान दिले आहे, अशी प्रतिक्रिया वंदे मातरम् सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जोशी यांनी व्यक्त केली. दरम्यान रूग्ण असलेल्या आईने वैद्यनाथाची प्रतिमा डॉ. बिराजदार यांना भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. तीन दिवस डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर भागिरथीबाई जोशींना लगेच आराम मिळाला. अंबाजोगाईच्या रूग्णालयात उपचार चांगले होत असून कोरोना कालावधीत ही डॉ. बिराजदार यांनी दिलेली सेवा कौतुकास्पद असल्याचे जोशी म्हणाले.

===Photopath===

130521\13bed_6_13052021_14.jpg

Web Title: Mauli blesses the life-saving doctor