शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मस्साजोग सरपंच हत्याप्रकरण; सीआयडीच्या पथकांचा देशभरात तपास, मारहाणीचे व्हिडिओ हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:24 IST

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद बीडच नव्हे तर राज्यभर उमटत आहेत.

बीड : मस्साजोग सरंपच हत्या, दोन कोटी रुपयांची खंडणी या दोन गुन्ह्यांत आरोपी असलेल्या वाल्मीक कराडसह चार आरोपींचे बँक खाते सीआयडीकडून फ्रीज करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या शोधासाठी सीआयडीचे नऊ पथके देशभरात धावपळ करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद बीडच नव्हे तर राज्यभर उमटत आहेत. यासह दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. कराडला अटक करून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकला, अशी मागणी शनिवारी मोर्चातून करण्यात आली होती. हेच गांभीर्य लक्षात घेऊन सीआयडीने तपासाची गती आणखी वाढविल्याचे दिसत आहे. हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि खंडणीतील वाल्मीक कराड या चार आरोपींचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या शोधासाठी सीआयडीच्या नऊ पथकांकडून देशभरात धावाधाव सुरू आहे. यामध्ये जवळपास १५० अधिकारी, कर्मचारी असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व फरार आरोपींचे पासपोर्टबाबतही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे त्यांना देश सोडून जाता येणार नाही. सीआयडीचे छत्रपती संभाजीनगरचे पाेलिस अधीक्षक सचिन पाटील हे रात्री आठ वाजताही बीड शहर ठाण्यात ठाण मांडून होते.

आरोपींचे ठसे जुळलेपोलिसांनी घटनेनंतर एक काळ्या रंगाची चारचाकी गाडी जप्त केली होती. त्यावरील ठसे आणि अटकेत असलेल्या आरोपींच्या ठशांची तपासणी केली असता ते जुळले आहेत. हा मोठा पुरावा सीआयीडीच्या हाती लागला आहे.

मारहाणीचे चार व्हिडीओही हाती लागलेपोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही व्हिडीओदेखील हाती लागले आहेत. तसेच त्या मोबाइलमधून कोणाला कॉल केले, याचीही माहिती पोलिसांनी घेतली. यात काही राजकीय नेत्यांना कॉल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

संध्या सोनवणे यांची दिवसभर चौकशीराष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांना रविवारी सकाळीच बीड शहर पोलिस ठाण्यात आणले होते. रात्री आठ वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरूच होती. त्यांचे जबाब घेण्यासह इतरही काही पुरावे त्यांच्याकडून मिळवले जात आहेत. सोनवणे यांचा यात काय रोल आहे, त्यांना चौकशीसाठी का बोलावले? याबाबत चर्चांना उधान आले होते.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडCrime Newsगुन्हेगारी