ग्रामीण भागातही रूजतेय सामूहिक संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:06+5:302021-02-05T08:24:06+5:30
महिलांचा आनंदी उपक्रम : प्रथमच सुवासिनींचे एकत्रीकरण शिरूर कासार : शिकल्यासवरल्या महिलांनी गावच्या विकासाचा संकल्प करत ...

ग्रामीण भागातही रूजतेय सामूहिक संक्रांत
महिलांचा आनंदी उपक्रम : प्रथमच सुवासिनींचे एकत्रीकरण
शिरूर कासार : शिकल्यासवरल्या महिलांनी गावच्या विकासाचा संकल्प करत ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून संकल्प सिद्धीचा निर्णय घेत निवडून आलेल्या महिलांनी सरपंचपदाची निवड होण्यापूर्वीच एक अभिनव उपक्रम राबवला. शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही सामूहिक संक्रांत संकल्पना राबवत महिलांचे एकत्रीकरण व सबलीकरणाचा पहिला प्रयोग सिद्धीस नेला. काकडहिरा येथील मिनाक्षी जायभाये यांनी आपल्या सहचारिणी सदस्य सविता जायभाये , गयाबाई जायभाये ,चंद्रकला तुपसौंदर व पुनम जायभाये यांना सोबत घेत गावच्या इतिहासात प्रथमच सामूहिक संक्रांत हळदी कुंकू तसेच वाण लुटण्याचा उपक्रम हाती घेतला. एकाच ठिकाणी सगळ्यांच्या भेटीची ही संकल्पना नावीन्यपूर्ण वाटल्याने ग्रामीण महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकत्रीकरण व सबलीकरणाचा मंत्र या माध्यमातून देण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांमध्येही देखील वेगळा आनंद दिसून आला. गावच्या विकास रथाचे एक चाक या महिला असतात सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केल्यास विकास साधणे फार अवघड नसते असे मिनाक्षी जायभाये यावेळी म्हणाल्या.