अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्षा शरयू हेबाळकर होत्या. तर मुख्याध्यापक निवृत्ती दराडे, उपमुख्याधापक, बाळासाहेब केंद्रे, ज्ञानेश मातेकर, मंगेश मुळी मंचावर उपस्थित होते. मंगेश मुळी यांनी कॅप्टन कृष्णकांत यांच्या जीवन कार्याचा व पराक्रमाचा परिचय करून दिला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी शरयू हेबाळकर यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात स्वयंशिस्त निर्माण करून राष्ट्र सेवा उच्च ध्येय ठेवावे. कॅप्टन कृष्णकांत यांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात श्री सरस्वती, दत्तोपंत ठेंगडी, कॅप्टन कृष्णकांत यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक लक्ष्मण काटे तर शांती मंत्र श्रीकांत देशपांडे यांनी सांगितला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.
080721\img-20210707-wa0074.jpg
अंबाजोगाई येथील खोलेश्वर विद्यालयात शहीद कृष्णकांत दिन साजरा झाला