पैशांसाठी विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:06+5:302021-08-28T04:37:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : तालुक्यातील शिरापूर गात येथील विवाहितेने माहेरहून ट्रॅक्टर खरेदीसाठी पाच लाख रुपये आणले नाहीत ...

पैशांसाठी विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : तालुक्यातील शिरापूर गात येथील विवाहितेने माहेरहून ट्रॅक्टर खरेदीसाठी पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून तिचा छळ केला. या छळास कंटाळून तिला आत्महत्येस प्रवृत केले. याप्रकरणी शिरूर पोलिसात पती, सासू, सास-याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
माणिक शंकर गुंगासे (रा. गुंजमूर्ती, ता.घनसांगवी) यांनी याबाबत शिरूर पोलिसात फिर्याद दिली. शिरापूर गात येथील कपिल भीमराव बनगे यांनी विवाहिता मनीषा कपिल बनगे (वय ३२) हीस माहेरहून ट्रॅक्टर खरेदीसाठी पाच लाखांची मागणी करत. यामुळे तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात असे. या छळास कंटाळून तिने २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शिरापूर गात येथे घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक डॉ.रामचंद्र पवार यांनी भेट दिली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार अशोक सोनवणे हे करीत आहेत.