शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:21 AM

जनावरांना पिण्यासाठी पाणी शेंदताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने विवाहितेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील कोद्री येथे मंगळवारी दुपारी घडली.

अंबाजोगाई / केज : जनावरांना पिण्यासाठी पाणी शेंदताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने विवाहितेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील कोद्री येथे मंगळवारी दुपारी घडली.प्रियंका प्रदीप लुंगारे (वय २१, रा. कोद्री, ता. अंबाजोगाई) असे त्या विवाहितेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ३.४५ वाजता जनावरांना पाणी देण्यासाठी शेतात गेली होती. स्वत:च्या शेतातील विहिरीतून पाणी शेंदत असताना तोल गेल्याने ती विहिरीत पडली. विहिरीत भरपूर पाणी असल्याने बुडून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस जमादार अभंग यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला. प्रियंकाचे लग्न तीन वर्षांपूर्वी प्रदीपसोबत झाले होते. त्यांना दीड वर्षाची एक मुलगी आहे.दरम्यान, मयत प्रियकांचे वडील राजाभाऊ विभूते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेतात बोअर घेण्यासाठी माहेरहून ७० हजार रुपये आणावेत म्हणून पती प्रवीण लुंगारे, सासरा मधुकर लुंगारे, सासू मीरा लुंगारे, दीर संदीप लुंगारे यांनी तगादा लावला होता. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असे. या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यानुसार चौघांविरुद्ध युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अश्विनी कुंभार या तपास करीत आहेत.नातेवाईकांनी रोखले होते शवविच्छेदनदरम्यान, प्रियंका तोल जाऊन पडली नसून तिला सासरच्या मंडळींनी विहिरीत ढकलून मारल्याचा आरोप करत माहेरच्यांनी शवविच्छेदन रोखून धरले होते. यामुळे ‘स्वाराती’च्या न्यायवैद्यक विभागाच्या परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. परंतु, पोलिसांनी प्रियंकाच्या नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर त्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.

टॅग्स :Beedबीडdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदाCrime Newsगुन्हेगारी