५० हजारांसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:12 IST2021-09-02T05:12:32+5:302021-09-02T05:12:32+5:30

गेवराई : दुचाकी घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये घेऊन ये, असे म्हणत नवऱ्याने पत्नीस दगडाने व काठीने मारहाण केले ...

Marital harassment for 50 thousand | ५० हजारांसाठी विवाहितेचा छळ

५० हजारांसाठी विवाहितेचा छळ

गेवराई : दुचाकी घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये घेऊन ये, असे म्हणत नवऱ्याने पत्नीस दगडाने व काठीने मारहाण केले तसेच, सासरा, दीर व नणंद यांनी तू पैसे का नाही आणले म्हणत हिला मारून टाक असे म्हणत शिवीगाळ केली. या प्रकरणी विवाहिता गंभीर जखमी असून तिच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मंगळवारी गेवराई पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे, दीर व नणंद अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र अजून अटक नाही.

अनिता रमेश राठोड (वय २५, रा. सुशी तांडा) असे मारहाण झालेल्या विवाहितेचे नाव असून तिचा विवाह २०१४ रोजी रमेश धोंडिबा राठोड (रा. सुशी तांडा) यांच्याशी झाला. लग्नानंतर काही दिवस सुखाचे गेले. मात्र, पहिली मुलगी झाली व तुला पहिली मुलगीच झाली. मुलगा पाहिजे होता म्हणून त्रास देऊ लागले नंतर दोन मुले झाली. २४ ऑगस्टला पतीला मोटारसायकल घ्यायची असून तू माहेरून ५० हजार रुपये घेऊन ये, म्हणून मानसिक व शारीरिक छळ करून मला पती रमेश राठोड याने दगडाने व काठीने मारहाण केली तसेच सासरा धोंडिबा राठोड, दीर बाळासाहेब राठोड,नणंद सोनाबाई जाधव यांनी तू माहेरून पैसे नाही आणले ही मारून टाक, असे म्हणत शिवीगाळ केली. विवाहिता गंभीर जखमी असून औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अनिता रमेश राठोड हिच्या फिर्यादीवरून चार जणाविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ३१) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अजून अटक झालेली नाही तरी आरोपीला अटक करावी, अशी मागणी नातेवाईक यांनी केली आहे. याचा तपास पो.हे.काॅ अशोक जाधव हे करत आहेत.

Web Title: Marital harassment for 50 thousand