मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालय अंबाजोगाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:19 IST2018-01-04T00:19:39+5:302018-01-04T00:19:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : लातूर आणि बीड जिल्ह्याचा प्रमुख जलस्त्रोत असणाºया मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालय लातूरहून अंबाजोगाईत स्थलांतरित ...

मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालय अंबाजोगाईत
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : लातूर आणि बीड जिल्ह्याचा प्रमुख जलस्त्रोत असणाºया मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालय लातूरहून अंबाजोगाईत स्थलांतरित करण्याचे आदेश शासनाने बुधवारी दिले. हे कार्यालय येत्या १५ जानेवारीपासून अंबाजोगाईत कार्यान्वित होणार आहे.
डाव्या कालव्यावरील केज आणि रेणापूर या दोन तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण अंबाजोगाई येत असल्याचे लक्षात घेता तसेच मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालय जिल्हा मुख्यालयाऐवजी क्षेत्रीय स्तरावर असणे प्रशासकीयदृष्ट्या सोयीचे आहे. त्यामुळे मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालयाचे मुख्यालय लातूर येथून अंबाजोगाई येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याचे शासनाने दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच हे कार्यालय तातडीने म्हणजेच येत्या १५ जानेवारीला कार्यान्वित करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत.
कार्यालयातील मंजूर पदे आणि सध्या नियुक्त असणारे अधिकारी आहे तेच राहणार आहेत. हे कार्यालय कोणताही नवीन खर्च न करता शासकीय जागेत म्हणजेच मांजरा वसाहत परिसरात सुरु होण्याची शक्यता आहे. मांजरा डाव्या कालव्यावर अवलंबून असणाºया शेतकºयांची सोय होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.