बनसारोळा, आवसगाव, सावळेश्वर,पाथरा गावांना मानवलोकचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST2020-12-24T04:29:04+5:302020-12-24T04:29:04+5:30
पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी क्रांती केली. यामध्ये भाजीपाला, फळबाग लागवड वाढत आहे. सीताफळ, पेरूसारखी लागवड वाढत असून ही एक ...

बनसारोळा, आवसगाव, सावळेश्वर,पाथरा गावांना मानवलोकचे मार्गदर्शन
पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी क्रांती केली. यामध्ये भाजीपाला, फळबाग लागवड वाढत आहे. सीताफळ, पेरूसारखी लागवड वाढत असून ही एक आनंदाची बाब असल्याचे मत अनिकेत यांनी व्यक्त केले. मात्र त्याचबरोबर दुसरीकडे पाणी आल्यानंतर पाणी वापराबद्दल चिंता व्यक्त केली. ऊसाचे क्षेत्र वाढताना दिसून आले. ऊसाचे क्षेत्र वाढवण्यापेक्षा आहे त्या क्षेत्रावर ऊसाचे टनेज शंभर टनापेक्षा जास्त उतार एकरी काढावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
फळबागाच्या संदर्भात बोलत असताना फळबागांची मूल्य साखळी निर्माण व्हावी यासाठी मानवलोकच्या सहकार्यातून येणाऱ्या काळात आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाला क्षेत्र वाढवावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
समृद्ध गाव स्पर्धेत काम करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत व गावातील विकासात हातभार लावावा.
माती, गवत, झाडे, जलसंधारण कामे व जलव्यवस्थापन करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे मत पाणी फाऊंडेशन समनव्यक संतोष शिनगारे यानी व्यक्त केले.
यावेळी सावळेश्वर येथे सुरू असणाऱ्या विहीर पाणी पातळी मोजमापाच्या प्रशिक्षणाला ही भेट देऊन प्रशिक्षणार्थीं यांचा उत्साह वाढवून त्याच्याशी हितगुज साधले. पाणी फाउंडेशन च्या वतीने प्रवीण काथवटे व शिवलेश्वर मेदने यांनी अनिकेत लोहिया व गावकरी, अधिकारी याचे आभार आभार मानले.