शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी बस स्थानकातून महिलेची सोनसाखळी चोरून गाठला माळशेज घाट; दोन चोरटे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 16:23 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माळशेज घाटातील एका बंद पडलेल्या हॉटेलमधून घेतले ताब्यात

- नितीन कांबळे कडा - बसची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून नेल्याची घटना १८ रोजी घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे  शाखेने खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून दोघांच्या माळशेज घाटात एका बंद पडलेल्या हॉटेलमधून बुधवारी रात्री मुसक्या आवळल्या. दोन्ही आरोपींना आष्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अल्पवधीत आरोपी ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक केले जात आहे.

आष्टी तालुक्यातील मुर्शदपूर येथील विजया विश्वनाथ शिंदे या १८ मे रोजी पुण्याला जाण्यासाठी दुपारच्या दरम्यान आष्टी बसस्थानकात आल्या होत्या. बसची वाट पाहत असताना यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. अज्ञात चोरटय़ांविरुद्ध १९ रोजी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या बीडच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन याची माहिती घेतली. 

दरम्यान, पथकाने रविवार पासून तपासाला सुरुवात केली. त्यानंतर खबऱ्याच्या माहितीवरून पथकाने बुधवारी रात्री माळशेज घाटातील एका बंद पडलेल्या गणेश दिनकर झिंजुर्डे व किशोर भाऊसाहेब शेळके ( दोघे रा. पाथर्डी जि.अहमदनगर ) यांना ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हाची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना आष्टी पोलीसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरु आहे. 

ही कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, पोलीस उपनिरीक्षक पोलीस भगतसिंग दुल्लत,हेडकॉन्स्टेबल मनोज वाघ ,पोलीस नाईक सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे ,सलीम शेख, अशोक सुरवसे ,अशोक कदम यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड