परीक्षा फॉर्म भरण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची दमछाक बँकखाते अनिवार्य अट काढा : विद्यार्थी-पालकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST2021-01-08T05:49:37+5:302021-01-08T05:49:37+5:30

विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी आधी पॅनकार्ड काढून खाते उघडावे लागते. यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो तर शाळेला ...

Make it a mandatory condition for 10th class students to fill up the exam form in the bank account: Demand of students-parents | परीक्षा फॉर्म भरण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची दमछाक बँकखाते अनिवार्य अट काढा : विद्यार्थी-पालकांची मागणी

परीक्षा फॉर्म भरण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची दमछाक बँकखाते अनिवार्य अट काढा : विद्यार्थी-पालकांची मागणी

विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी आधी पॅनकार्ड काढून खाते उघडावे लागते. यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो तर शाळेला शिक्षण विभागाकडून ११ तारखेपर्यंत फॉर्म भरून घेण्याचे आदेश असल्याप्रमाणे तशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या आहेत.

एकंदरीत या परिस्थितीमुळे दहावी आणि बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पॅनकार्ड काढून बँकेत खाते उघडण्यासाठी मोठी दमछाक होत आहे. बँकेत खाते उघडण्यातच परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख निघून जाऊ नये, अशी धास्ती विद्यार्थी घेत आहेत. त्यांना बँकेत खाते उघडून फॉर्म भरता यावा किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी बँक खाते उघडणे ही अट रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांतून होत आहे.

जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या अधिकारातील विषय असल्यामुळे आम्ही त्यांना पत्र देऊन हा विषय कळवू तसेच पॅनकार्डशिवाय बँकेत खाते उघडण्यात यावे असे विद्यार्थ्यांना पत्र देऊ. ही अडचण समजून वरिष्ठ पातळीवर तारीख वाढावी किंवा बँक खात्याची अट शिथील करावी, याबाबत प्रयत्न करू.- धनंजय शिंदे (आष्टी गटशिक्षणाधिकारी)

शिक्षण विभागाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन् परीक्षा फॉर्म भरून घ्यावेत, अशा सूचना आल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन फॉर्म भरून घेत आहोत. परंतु, बँक खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्यांना पॅनकार्ड मागण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांकडून बँक खाते उघडण्यासाठी विलंब होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांना सर्व सहकार्य करून त्यांना याकामी येत असलेली अडचण आम्ही वरिष्ठांना कळवू.

सुनील शिंदे (मुख्याध्यापक, इंदिरा माध्यमिक विद्यालय धामणगाव)

Web Title: Make it a mandatory condition for 10th class students to fill up the exam form in the bank account: Demand of students-parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.